राजकारण (Politics) हा एक उत्तम व्यवसाय असून या व्यवसायात केवळ पाच वर्षात आपली संपत्ती दुप्पट-तिप्पट वाढवण्याची संधी मिळते, हे लोकसभा उमेदवार निवडणूक प्रतिज्ञा पत्रांवरून स्पष्ट झाले आहे. (Politics)
काही प्रतिज्ञापत्रे पाहून त्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, राजकीय नेत्यांच्या उत्पन्नात आणि संपत्तीत कमी होत नाही, तर वाढतच जाते. कुणाचे उत्पन्न किती वाढले हे पाहण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने उदहरणादाखल काही राजकीय नेत्यांच्या निवडणूक प्रतिज्ञा पत्रांचा अभ्यास केला. त्यात विद्यमान खासदार भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे, ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील, भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच शिवसेना उबाठा गटाचे अनंत गीते यांच्या २०१९ आणि २०२४ च्या प्रतिज्ञा पत्रांचा आढावा घेतला. (Politics)
पाच वर्षात तिपटीपेक्षा अधिक
यात शिरूरचे खासदार आणि आता पुन्हा त्याच मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले उमेदवार अमोल कोल्हे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात तिपटीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये कोल्हे कुटुंबाची संपत्ती रु. ४.३३ कोटी होती तर या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात ती रु. १४.४२ कोटीच्या वर गेल्याचे स्पष्ट होते. (Politics)
१२७ कोटींवरून २०५ कोटी
भाजपाचे (BJP) माढा मतदार संघाचे खासदार आणि यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात असलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची आणि त्यांचे कुटुंब तसेच अवलंबित असलेल्या व्यक्तीची संपत्ती २०१९ ला रु. १२७ कोटी होती तिच्यात वाढ होऊन २०२४ मध्ये रु.२०५ कोटीपर्यंत पोहोचली. (Politics)
(हेही वाचा – Deep Cleaning : गगराणी यांनी ठेवले सफाई कामगारांच्या खांद्यावर हात, मिळवले कामगारांच्या हृदयात स्थान)
अनंत गीते यांच्या संपत्तीत ५० टक्के वाढ
माजी खासदार, शिवसेना उबाठा गटाचे रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनंत गीते यांच्या संपत्तीत ५० टक्क्यांनी वाढ झाली. २०१९ मध्ये त्यांनी प्रतिज्ञा पत्रात आपली संपत्ती जाहीर केली टी रु ७.१९ कोटी आणि या निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांची संपत्ती १०.५३ कोटी रु इतकी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत त्यांचा तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी पराभव केला होता. (Politics)
जलील यांच्याही संपत्तीत भर
छत्रपती संभाजीनगर मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि या निवडणुकीतील ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्याही संपत्तीत भर पडली आहे. २०१९ ला ३.७६ कोटी रुपये असलेली संपत्ती २०२४ ला ४.१५ कोटी रुपये झाल्याचे दिसून आले. अमरावतीच्या खासदार आणि आता भाजपाच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा यांच्याही संपत्तीत पाच वर्षात जवळपास दोन कोटी रुपयांची वाढ आली आहे. २०१९ मध्ये रु. १२.४५ कोटीची संपत्ती १४.४६ कोटीवर गेली. उमेदवार प्रतिज्ञा पत्रात तरी खरी संपत्ती जाहीर करतात की त्यातही अजून काही लपवाछपवी करतात याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. (Politics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community