आधी लस आता व्हेंटिलेटरचे राजकारण?

लसीकरण झाले, आता लवकरच नादुरुस्त व्हेंटिलेटरचे राजकारण सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

लसीकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेले राजकारण थांबत नाही, तोच आता पीएम केअर मधून मिळालेल्या व्हेंटिलेटरवरुन राज्यात राजकारण तापले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तर आता पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे सांगितले. पीएम केअरमधून मिळालेल्या 4 हजार 127 व्हेंटिलेटरपैकी 332 व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. तर शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 250 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली. त्यामुळे लसीकरण झाले, आता लवकरच नादुरुस्त व्हेंटिलेटरचे राजकारण सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

राज्यात टेक्निशियनचा अभाव

राज्यासाठी पीएम केअर फंडातून यावर्षी 4 हजार 127 व्हेंटिलेटर आले. त्यापैकी 3 हजार 775 व्हेंटिलेटर सुस्थितीत आहेत, तर 332 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 332 व्हेंटिलेटर मध्ये काही तांत्रिक बिघाड असून हे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी व्हेंटिलेटरच्या टेक्निशियनची गरज आहे. मात्र टेक्निशियनचा अभाव असल्यामुळे हे व्हेंटिलेटर सध्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. व्हेंटिलेटर दुरुस्थिसाठी टेक्निशयन टीम तयार करण्याची गरज असून, त्याच्या माध्यमातून व्हेंटिलेटर दुरुस्त करण्याचे काम केले जाईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

(हेही वाचाः ठाकरे सरकारला नको आहे केंद्राची मदत?)

अनिल देशमुख यांची माहिती

तर तिथेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी देखील शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांना जवळपास अठराशे व्हेंटिलेटर मिळाले असून, त्यापैकी 250 व्हेंटिलेटर हे नादुरुस्त आहेत. हे व्हेंटिलेटर लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत म्हणून व्हेंटिलेटर बनवणाऱ्या संबंधित कंपनीला कळवण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

(हेही वाचाः व्हेंटिलेटर्सच्या बाबतीत सचिन सावंत यांनी केलेला आरोप खोटा! आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here