राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे म्हणाले की, माझे सरकार गेले, मुख्यमंत्री पद गेले याची अजिबात खंत नाही. पण माझी माणसे दगाबाज निघाली, असे त्यांनी वक्तव्य केले आहे. मी गुंगीत असताना, सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे, ठाकरे यांनी या मुलाखतीत सांगितले.
राज्यातील जनता निवडणुकीची वाट पाहत आहे
ज्यांनी माझ्याशी दगाबाजी केली त्यांनी स्वत:च्या बापाच्या नावांनी मते मागावीत. आमच्या बापाच्या नावाने मते मागू नका. त्याचबरोबर शिवसेना कायद्याची आणि रस्त्यावरची लढाई जिंकेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातली जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. शिवसेना कोणाची याचे पुरावे द्यायची गरज नाही. निवडणुका येऊ द्या. आम्ही यांना पुरुन टाकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
( हेही वाचा: तेव्हा तुमचे वडील नरेंद्र मोदी होते का? मुनगंटीवारांचा ठाकरेंवर घणाघात )
राजकारणात जिने जन्म दिला, तिलाच गिळायला निघाले
राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असे आपण म्हणत होतो. पण केवळ तसे नाही आहे. राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे. पण तितकी ताकद त्यांच्यामध्ये नाही. कारण आई ही शेवटी आई असते.
Join Our WhatsApp Community