Yavatmal : जेवणासाठी चक्क २५ मिनिटे मतदान केंद्र बंद ठेवले; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार

संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता

229
Yavatmal : जेवणासाठी चक्क २५ मिनिटे मतदान केंद्र बंद ठेवले; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार

दुपारच्या वेळात कामानिमित्त सरकारी कार्यालय किंवा बॅंकेत गेलात तर कर्मचारी जेवणाच्या वेळी ग्राहकांना बाहेर ताटकळत उभे ठेवतात. ही सवय या कर्मचऱ्यांना मतदानाच्या दिवशी ही मतदान केंद्र संभाळताना सोडाविशी वाटली नाही. आणि यवतमाळ (Yavatmal Hiware Constituency) येथील हिवरे मतदार संघात जेवणासाठी २५ मिनिटे मतदान केंद्रच बंद ठेवले. दरम्यान, नागरिक आपली काम बाजूला ठेवून लोकशाहीचं कर्तव्य बजावण्यास गेलेल्या मतदारांना मात्र ताटकळत बसावं लागलं.  

(हेही वाचा – भारत सरकारच्या प्रशासकीय सेवेत कार्य केलेले कलाकार Jagannath Prasad Das )

दरम्यान. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा आज दूसरा टप्पा पार पडला. यामध्ये वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील (Washim-Yavatmal Lok Sabha Constituency) यवतमाळच्या हिवरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Hiware ZP School) मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी तब्बल २५ मिनिटं मतदान केंद्र बंद (25 minutes polling station closed) ठेवण्यात आलं होतं. 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरेंचा मूळ जाहीरनामा काँग्रेसचाच; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल)

मतदान केंद्राला कड्या लावून आतमध्ये निवडणुकीच्या ड्युटीवर असलेले कर्मचारी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी मतदानासाठी आलेले मतदार केंद्राबाहेर बसलेलेही दिसून आले आहेत. याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्यावर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.     

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.