Pooja Khedkar Controversy : मनोरमा खेडकरनेही लोकसभा उमेदवारी अर्ज भरला होता, पण..

184
Pooja Khedkar Controversy : मनोरमा खेडकरनेही लोकसभा उमेदवारी अर्ज भरला होता, पण..
Pooja Khedkar Controversy : मनोरमा खेडकरनेही लोकसभा उमेदवारी अर्ज भरला होता, पण..
  • सुजित महामुलकर

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई ५७ वर्षीय मनोरमा खेडकर हिनेदेखील जून २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती उघड झाली आहे. (Pooja Khedkar Controversy)

मनोरमा खेडकर हिला पिस्तुलाने एका शेतकऱ्याला धमकावल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. (Pooja Khedkar Controversy)

मनोरमा अपक्ष

खेडकर कुटुंबाचे रोज नवनवीन प्रताप समोर येत असताना आता पूजाच्या आईने लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून आपला निवडणूक अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केला होता. तर पूजाचे वडील दिलीप यांचा वंचित बहुजन आघाडीतर्फे भरण्यात आलेला उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि मनोरमा हिने आपला अर्ज मागे घेतल्याचे निवडणूक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. (Pooja Khedkar Controversy)

फक्त १ टक्का मते, डिपॉजिट जप्त

अहमदनगर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नीलेश लंके विजयी झाले तर त्यांनी तत्कालीन खासदार सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत १३ लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले त्यातील दिलीप खेडकर यांना केवळ १३,००० म्हणजेच फक्त १ टक्का मते पडली आणि त्यांचे डिपॉजिट जप्त झाले. (Pooja Khedkar Controversy)

मनोरमाचा ई-मेल पूजाच्या नावे

मनोरमा हिने तिच्या प्रतिज्ञापत्रात पती म्हणून दिलीप यांचे नाव आणि त्यांच्या नावावारील संपत्तीची माहिती दिली असल्याने त्यांच्या घटस्फोट हा निव्वळ बनाव असल्याचे उघड झाले आहे. मनोरमाने तिचा ईमेल [email protected] असा असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. (Pooja Khedkar Controversy)

६०० ग्राम सोन्याचे दागिने 

आपल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती दिली त्यात मनोरमाने ६०० ग्राम सोन्याचे दागिने असल्याचे म्हटले असून त्यात गळ्यातील सोन्याचा हार २०० ग्राम, मंगळसूत्र १०० ग्राम आणि सोन्याच्या बांगड्या ३०० ग्राम तर १५ लाखाचा डायमंडचा हार आणि ३ लाखाच्या कानातील डायमंड रिंग असल्याचे नमूद केले आहे. मनोरमाने तिच्या स्वतःच्या मालमत्तेची किंमत जवळपास ३६ कोटी रुपये जाहीर केली आहे. (Pooja Khedkar Controversy)

१७ लाखांचे घड्याळ

तर मनोरमाचे पती दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची माहिती देताना गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील ब्रेसलेट प्रत्येकी १०० ग्राम वजनाचे असून १७ लाख रुपये किमतीचे हातातील सोन्याचे घड्याळ आणि ४ लाखांची अंगठी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (Pooja Khedkar Controversy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.