सहानुभूतीतून मिळालेली लोकप्रियता फार काळ टिकत नाही; रत्नाकर महाजनांचा Uddhav Thackeray यांना टोला

146

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत. जागा वाटपाच्या विषयावर महायुती आणि महाविकास आघाडीत चर्चेला उधाण आले आहे. अशातच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी मात्र मुख्यमंत्री पदावर दावा केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली. त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांनी मोजक्या शब्दांतच टिप्पणी केली, त्यांची फेसबुकवरील पोस्ट जोरदार चर्चेला आली आहे.

(हेही वाचा Harassment : पत्नीच्या अत्याचाराला कंटाळून घर सोडून गेला; पोलिसांनी पकडल्यावर म्हणाला…)

उद्धव ठाकरेंना डिवचले  

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा केल्यावर चर्चेला जोर आला आहे. त्याला महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसकडून विरोध होऊ लागला आहे. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नवीन भाष्य केले. त्यामध्ये ते म्हणाले की, जर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे येणार असेल तर माझा त्यांना पाठिंबा असेल, असे वक्तव्य केले. यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. अशा वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तोच हाणला, सहानुभूतीतून मिळालेली लोकप्रियता फार काळ टिकत नाही, असे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे उद्धव ठाकरे यांना महाजन यांनी चक्क आगामी विधानसभा निवडणुकीत मिळणाऱ्या यशाबद्दल शंका उपस्थित केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.