मनसेसाठी सकारात्मक वातावरण – बाळा नांदगावकरांचा विश्वास 

140
सत्ता बदलानंतर शुक्रवारी, १५ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतली. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीच्या दरम्यान काय चर्चा झाली याविषयीचा तपशील आमच्यापर्यंत पोहचला नाही, परंतु तरीही सध्या मनसे करता सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, मनसेचा येणाऱ्या काळातही एकाला चलो रे हीच भूमिका असणार, असे स्पष्ट केले.

राज ठाकरे हे मोबदला पाहून कुणाला मदत करत नाहीत

राज ठाकरे यांनी विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपाला मदत केली, मात्र राज ठाकरे हे मोबदला पाहून कुणाला मदत करत नाहीत, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले. मनसेकरता वातावरण अत्यंत सकारात्मक आहे. कारण सध्या सर्व पक्षांबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोण कधी कुणाचा शत्रू होईल आणि कोण कुणाचा मित्र हा सध्या सांगता येत नाही. त्यामुळे मनसे विषयी आता सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, असेही बाळा नांदगावकर म्हणाले. भविष्यात मनसे कुणाशी युती किंवा आघाडी करेल हे सांगता येत नाही. आजही मनसेचा एकाला चालो रे चा नारा कायम आहे, असेही नांदगावकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.