संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता आहे. ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणाची मंगळवारी (१२ नोव्हेंबर) सुनावणी होणे आहे. यात महुआ यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली जाऊ शकते. (Cache For Query Case)
भाजपचे खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील आचार समितीाची मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. आचार समितीने ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे आणि उद्याच्या बैठकीत खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई करण्याचा मसुदा स्वीकारला जाऊ शकतो. यात त्यांना अपात्र ठरविण्याची शिफारस आचार समितीकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली जावू शकते अशी चर्चा आहे. (Cache For Query Case)
१५ सदस्यांच्या आचार समितीत भाजप खासदारांची संख्या जास्त आहे. यामुळे भाजपचे आहे असे म्हणायला हरकत नाही. आचार समितीने २००५ मधील लाच-प्रश्न प्रकरणात अनेकांवर कारवाई केली होती. मोईत्रा यांच्या प्रकरणाला त्या प्रकरणाशी जोडून कारवाईची दिशा ठरविली जाऊ शकते. (Cache For Query Case)
दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांना पत्र लिहून उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनाही चौकशीसाठी बोलाविण्याची मागणी केली आहे. दर्शन हिरानंदानी आणि वकील जय अनंत देहादराई यांना समोरासमोर बसून त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (Cache For Query Case)
(हेही वाचा – Virat @35 : विराट जेव्हा ईडन गार्डन्सच्या ग्राऊंड स्टाफबरोबर केक कापतो…)
एवढेच नव्हे तर, महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महुआने लिहिले की, ‘मला माहित आहे की भाजप माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची योजना आखत आहे. त्यांचे स्वागत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, सीबीआय आणि ईडीने १३,००० कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळ्यात अदानीविरुद्ध गुन्हा नोंदवायला हवा. त्यांना मला हे विचारू नये की माझ्याकडे चपलांचा किती साठा आहे. (Cache For Query Case)
मोईत्रा यांनी पुढे लिहिले की, ‘एका खोट्या तक्रारीच्या आधारावर एका महिला खासदाराला संसदेतून हाकलून लावण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी भाजपने एक गोष्ट लक्षात ठेवावी. माझ्याकडे आचार समितीच्या नोंदींची एक प्रत आहे. यात अध्यक्षांचे चीप, किळसवाणे आणि काहीही संबंध नाही असे विचारलेले प्रश्न, मी केलेला विरोध, विरोधी पक्षांनी केलेला विरोध असे सर्व काही अधिकृत रूपात माहिती आहे’. अशात, या मुद्यावर राजकारण तापण्याची दाट चिन्हे आहेत. उद्याच्या बैठकीत मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. (Cache For Query Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community