काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर त्याची फार मोठी चर्चा झाली होती. पण आता मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या घरातली बत्ती गुल झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. त्यामुळे आता मंत्र्यांनाही अंधारात रहावे लागले आहे.
15 मिनिटांसाठी पसरला अंधार
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मुंबईतील मंत्रालय परिसरातील काही मंत्र्यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास 15 मिनिटे मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांतील बत्ती गुल झाली होती. या दरम्यान मंत्र्यांच्या घरात अंधार पसरला होता. यामध्ये शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये ही अवस्था असेल तर मग सर्वसामांन्यांचं काय असा प्रश्न आता विचारला जात आहे.
(हेही वाचाः ‘तर मी हात तोडून हातात देईन’,सुप्रिया सुळेंना का झाला संताप अनावर?)
ऊर्जामंत्र्यांच्या विश्रांतीचा झाला खोळंबा
शुक्रवारी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देखील लोडशेडिंगचा चांगलाच फटका बसला. जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर असताना नितीन राऊत हे शासकीय विश्राम गृहात विश्रांतीसाठी थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या विश्राम गृहातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे राऊतांच्या विश्रांतीचा चांगलाच खोळंबा झाला होता.
(हेही वाचाः नवाब मलिक येणार घराजवळ, पण…)
Join Our WhatsApp Community