गेल्या वर्षी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कार्डिलिया क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत सापडल्याने एनसीबीने अटक केली होती, तेव्हापासून एनसीबीचे तेव्हाचे मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे अधिक चर्चेत आले. मात्र त्यानंतर वानखेडे यांनी या प्रकरणात खंडणी वसूल केल्याचा आरोप झाला, हा आरोप प्रभाकर साईलने केला होता. त्यामुळे समीर वानखडे प्रकरणात साईल हा मुख्य साक्षीदार होता, परंतु त्याच्या निधनाने आता या प्रकरणावर परिणाम होणार आहे.
शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे प्रभाकर साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे आर्यन खान प्रकरणी एनसीबीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत मागितली होती याचा अर्थ या प्रकरणात आणखी तपास बाकी आहे, हे स्पष्ट होते. परंतु न्यायालयाने ६० दिवसात कालावधी दिला. परंतु आता या प्रकरणातील मुख्य दुआ गेल्यामुळे हे प्रकरण कमकुवत होणार आहे.
(हेही वाचा गुढीपाडव्यामुळे एसटी कामगारांवरील कारवाई टळली)
कोण आहे प्रभाकर साईल?
- आर्यन खान याला अटक केली तेव्हा तो पंच होता
- प्रभाकर साईल हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होता.
- आर्यन खान प्रकरणी प्रभाकर साईल याने विविध आरोप केले होते. या आरोपामुळेथेट समीर गायकवाड अडचणीत आले होते
काय आरोप केलेले?
एनसीबीने १० कोऱ्या कागदांवर माझी स्वाक्षरी घेतली. तसेच मी गोसावींना ५० लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असे प्रभाकर साईल यांनी सांगितले होते. १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच २ ऑक्टोबर रोजी ७.३० वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रे दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community