राज्याच्या राजकारणात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी उफाळून आली असून अजित पवारांसह नऊ आमदारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या दृष्टीने पावले उचलत आता राष्ट्रवादीकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. शपथविधीला उपस्थित आलेल्या दोन खासदारांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)च्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव शरद पवारांकडे पाठवला होता. सुळे यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली होती.
(हेही वाचा – सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र घोषित करणार – मंगलप्रभात लोढा)
आता राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथ सोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. याच धर्तीवर आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर बडतर्फतेची कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय खजिनदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कारवाई केली. पटेल आणि तटकरे यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत असल्याची माहिती पवार यांनी ट्विट करून दिली
सुळे यांचे शरद पवारांना पत्र
सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पत्र पाठवले. या पत्रात भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्यासमोर दाखल करावी असा प्रस्ताव शरद पवारांकडे पाठवला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community