आमदार रवी राणा यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आज, मंगळवारी अमरावतीत जोरदार मेळावा घेतला. या मेळाव्याच भाषणाची सुरूवात बच्चू कडू यांनी शेरोशायरीने करत रवी राणांवर नाव न घेता चांगलाच हल्लाबोल केला.
काय म्हणाले बच्चू कडू
मेळावा सुरू झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले, की सत्ता गेली चुलीत आम्हाला काही पर्वा नाही. प्रहार काही आंडू पांडूचा पक्ष नाही. प्रहारमध्ये दहा वार करण्याची क्षमता आहे. तो बाजी आहे, तानाजी आहे. मैदानात असेल तर मैदानात, तलवारीत आले तर तलवारीत आणि सेवेत आले तर सेवेत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. 350 गुन्हे घेऊन अंगावर घेऊन फिरतोय असं म्हणत त्यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – मुंबई पोलिसांकडून सलमान खानला Y+ सुरक्षा, काय आहे प्रकरण?)
पुढे ते असेही म्हणाले की, ही पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो पण पुढच्या वेळी माफी मिळणार नाही. पुन्हा आमच्या वाटेला गेल्यास माफी नाही. आम्ही विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. मी राजकारणासाठी कोणाचा वापर केला नाही. जली को आग कहते है, बुझी को राख कहते है, असे म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडूंच्या प्रहार मेळाव्याला सुरूवात झाली.
मेळाव्यात बोलत असताना ते असेही म्हणाले की, मी उगाच गुवाहाटीला गेलो नाही. निर्णय कडू असले तरी चालेल पण काम गोड करता आले पाहिजे. जे बंडखोर आहेत. तेच पहिल्या पंक्तित आहे. आम्ही कधीच राजकारणासाठी दिव्यांगाचा वापर केला नाही तर आम्ही दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलो. सत्तेसाठी कधीही लाचारी केली नाही. सत्ता आणि पदापेक्षा माझ्यासाठी माझी लोकं महत्त्वाची आहे. मी महात्मा गांधी यांना मानतो. मात्र माझ्या डोक्यात भगतसिंग आहेत, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावे असा इशाराही त्यांनी दिला.
Join Our WhatsApp Community