प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी पु्न्हा एकदा गुवाहाटीला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच इच्छेमुळे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात काही भूकंप होण्याची प्लॅनिंग सुरु आहे का? असे विचारले असता बच्चू कडू यांनी सूचक विधान केले. आम्ही फार चर्चा करत नाही, आम्ही थेट अॅक्शन करतो, असे विधान बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा काही मोठ्या घडामोडी घडणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू?
कडू म्हणाले की, आमच्या प्लॅनिंगबद्दल तुम्हाला काहीही सांगितले नाही पाहिजे. आम्ही एकदम गुवाहाटीला गेल्यावरच तुम्हाला माहित होईल, तेव्हा थेट ब्रेकिंग न्यूज करा, असे विधान बच्चू कडू यांनी केले. बच्चू कडू यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
( हेही वाचा: SC Hearing: आमदारांना 5 वर्षांचा अधिकार, अध्यक्ष तो अधिकार काढून घेऊ शकत नाहीत; शिंदे गटाचा युक्तिवाद )
मंत्रीपदाबाबत बच्चू कडूंचे मोठे विधान
बच्चू कडू म्हणाले की, काही लोक मंत्री झाले, पण मी एक मंत्रालय निर्माण केले आहे. मंत्रालय निर्माण करणे महत्त्वाचे आहे की मंत्री होणे महत्त्वाचे आहे, हा फरक समजून घ्यायला हवा. आता या देशात नव्याने मंत्रालय निर्माण झाले आहे. गुवाहाटीला गेल्यामुळे ते झाले असेल तर आम्ही पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊ. शेतक-यांसाठी वेगळा मुद्दा घेऊन तिथे जाऊ. आम्हाला खोकेवाले म्हणतात. पण आम्ही मंत्रालयवाले आहोत. ज्याचे कुणी वाली नाही अशा अंपगांसाठी आम्ही जगातील पहिले अपंग मंत्रालय निर्माण केले. ही सगळ्यात मोठी उपलब्धी असल्याचे कडू यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community