प्रलंबित मागण्यांसाठी Prahar Janshakti Party आक्रमक

108
प्रलंबित मागण्यांसाठी Prahar Janshakti Party आक्रमक
  • प्रतिनिधी

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत, दिव्यांग नागरिकांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी (२५ सप्टेंबर) मंत्रालय शेजारील आकाशवाणी इमारतीच्या छतावर आणि परिसरात ठिय्या आंदोलन केले. अचानक केलेल्या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी त्यानंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सरकारने वेळीच निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. (Prahar Janshakti Party)

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, बोगस प्रमाणपत्र तर कारवाई, अर्थसंकल्पापैकी किमान ५ टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. सहा हजार मानधन या दिव्यांगाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र वेळोवेळी आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसली. तसेच कार्यवाहीच्या नावाखाली मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. (Prahar Janshakti Party)

(हेही वाचा – PM Narendra Modi गुरुवारी पुणे मेट्रोचे लोकार्पण करणार ; जाणून घ्या काय आहेत मेट्रो स्थानकाचे वैशिष्ट्ये ?)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील दिव्यांगाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन चार बैठका घेतल्या. मात्र सरकारकडून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे दिव्यांगांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली मंत्रालय जवळील आकाशवाणी इमारतीच्या छतावर आणि परिसरात आंदोलन केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता. तर कुठलाही गैर प्रकार घडू नये, यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. अचानक केलेल्या आंदोलनामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. (Prahar Janshakti Party)

निवडणुका जवळ येताच लाडक्या बहिणींना १,५०० रुपये देण्याची घोषणा केली. लवकरच त्या मानधनात वाढ करू, अशा घोषणा करत आहेत. परंतु, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार असल्याच्या घोषणेचा त्यांना विसर पडला आहे. तसेच दिव्यांगाची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे तातडीने बैठक लावून यावर तोडगा काढवा, अन्यथा राज्यभरात आंदोलन करू, असा इशारा आमदार कडू यांनी दिला. (Prahar Janshakti Party)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.