आता राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता ईडीच्या रडारवर ठाकरे सरकारला आणखी एक धक्का

137

महाविकास आघाडी सरकारचे नेते ईडीच्या रडारवर आहेत. आता त्यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपूरे यांची ईडीने तब्बल सात तास चौकशी केली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरणात ही चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे, त्यामुळे ही चौकशी ईडीकडून करण्यात आली आहे. प्राजक्त तनपुरे यांना ईडीने समन्स बजावला होता. मंगळवारी तनपुरे यांना ईडीने हजर राहण्यास सांगितले होते.

तर पुन्हा हजर राहणार 

चौकशीनंतर दिलेल्या मुलाखतीत तनपुरे म्हणाले की, मी सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. काही तांत्रिक  बाबी शिल्लक आहेत. काही आकडेवारी लक्षात नसल्याने त्याबाबतच्या तांत्रिक बाबी आहेत. ईडीने पुन्हा बोलवल्यास हजर राहणार असल्याचं तनपुरे यांनी सांगितले.

म्हणून केली जातेय कसून चौकशी 

महाराष्ट्र सहकारी बँकेनं अनेक साखर कारखान्यांना कर्ज दिले आहे. या कर्ज वाटपात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला होता. तसंच प्राजक्त तनपुरे यांनी नगरमधील राम गणेश गडकरी साखर कारखाना ज्याची मूळ किंमत 26 कोटी रुपये आहे तो 12 कोटीत विकत घेतला होता. या कारखान्यालाही महाराष्ट्र बँकेनं मोठं कर्ज दिलेलं होतं. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यासाठी प्राजक्त तनपुरे यांची कसून चौकशी केली जात आहे.

 ( हेही वाचा :नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने खडसावले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.