Prakash Ambedkar : वंचित आघाडी करू शकते युतीत बिघाडी?

145
Vanchit Bahujan Aghadi : प्रभावहीन वंचित आघाडीने शिवसेना उबाठाचे ३ आणि काँग्रेसचा एक उमेदवार पाडला

आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या सभांचं नियोजन वंचितकडून करण्यात येत असून याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा आंबेडकरांनी केल्या आहेत.आम्ही युती झाली नाही तर ४८ जागेवर निवडणूक लढवू. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. तसेच अकोला लोकसभा मी लढणार असल्याची घोषणाच आंबेडकरांनी केली. या सर्व घोषणा करण्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर चर्चा न झाल्याचे देखील सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये उबाठा तसेच I.N.D.I.A. आघाडीला (Prakash Ambedkar) देखील याचा फटका बसू शकतो.

(हेही वाचा – OBC Reservation : अखेर २१ दिवसांनंतर उपोषण मागे)

वंचित बहुजन आघाडीने (Prakash Ambedkar) लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून आपल्या सभांचे देखील नियोजन केलेले आहे. वंचितच्या सभांना सुरुवात २ ऑक्टोबरला लातूरला, ७ ऑक्टोबर रोजी सातारा, ११ ऑक्टोबर बीडला, तर २८ ऑक्टोबरला सटाणा येथे सभा होणार आहे. निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. त्यादृष्टीने वंचित प्रचाराच्या सभा आयोजित करीत असल्याचं त्यांनी म्हटलं.

वंचितच्या (Prakash Ambedkar) या अशा खेळीमुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी तसेच I.N.D.I.A. आघाडीचा खेळ बिघडवू शकते आणि मत विभाजनाचा फायदा भाजपा NDA ला होऊ शकतो. (Prakash Ambedkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.