देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवार १ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या सन्मानावेळी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भाषणातून पंतप्रधानांचे कौतुक केले. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर एकत्र दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाचा मुंबईतील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला?)
प्रकाश आंबेडकरांनी एक मीम शेअर करत शरद पवारांवर टीका केली आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली होती. तुम्हाला (शरद पवार) जर द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याबरोबर (भाजपा) जायचं असेल, तर खुशाल जावा. पण तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला फसवू नका. शरद पवार हे नेहमीच दुतोंडी वागले आहेत. ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात.
When you see things through a different lens, you realise that the #GormintAunty was right all along.
If you want to switch to the side of Merchant of Hate, Casteism and Death, then just do it. Don’t fool the people of #Maharashtra and India with your breakup stunts.… pic.twitter.com/z5N6GHJ9DK
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 2, 2023
या ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेचा मीम शेअर केला आहे. संबंधित मीममधील महिलेनं काही दिवसांपूर्वी सरकारविषयी अपशब्द उच्चारत टीका केली होती. सर्वजण मिळून आम्हाला पागल बनवत आहेत, अशी टीका त्या महिलेनं केली होती. त्यानंतर या महिलेची सोशल मीडियावर ‘गोरमेंट आंटी’ अशी ओळख निर्माण झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community