Prakash Ambedkar : वंचितची पहिली उमेदवार यादी; मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी?

Lok Sabha Election 2024 : २६ मार्च रोजी वंचितच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर Prakash Ambedkar यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली.

375
Lok Sabha Election 2024: वंचितची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ११ जणांचा समावेश, समाजातील सर्व जाती घटकांना स्थान
Lok Sabha Election 2024: वंचितची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ११ जणांचा समावेश

महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी फिस्कटली असतांनाच आघाडीत रहाणार कि नाही, याविषयी कोणतेही भाष्य न करता प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची (Vanchit bahujan aaghadi) लोकसभेची (Loksabha Election 2024) पहिली उमेदवार यादी जाहीर केली. २६ मार्च रोजी वंचितच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली.

२७ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी जाहीर केली. या यादीनुसार प्रकाश आंबेडकर स्वतः आकोल्यातून निवडणूक लढवणार आहेत.

(हेही वाचा – IPL 2024 : बंगळुरू संघाच्या पहिल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये असा झाला जल्लोष )

वंचितकडून कोणाला कुठे उमेदवारी ?
  • भंडारा-गोंदिया – संजय केवट
  • गडचिरोली – हितेश पांडूरंग मडावी
  • चंद्रपूर – राजेश बेले
  • बुलडाणा – वसंतराव मगर
  • अकोला – प्रकाश आंबेडकर
  • अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
  • वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंके
  • यवतमाळ-वाशिम – खेमसिंह पवार
पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन – प्रकाश आंबेडकर

२६ मार्च रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात काही निर्णय झाले. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) या पत्रकार परिषदेत म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.