Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे थेट वक्तव्य

Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे थेट वक्तव्य

305
Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे थेट वक्तव्य
Prakash Ambedkar : इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही; प्रकाश आंबेडकरांचे थेट वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेल्या इंडि आघाडीत आधीच बिघाडी झाली आहे. विरोधक निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच वेगळे झाले आहेत. अशात इंडिया आघाडीतील एक घटक पक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नुकतेच मविआमध्ये दाखल झालेले प्रकाश आंबेडकर यांनी ‘इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही’, असे विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहेत. (Prakash Ambedkar)

(हेही वाचा – Municipal Hospital: महापालिकेच्या रुग्णालयांत मुंबईबाहेरील रुग्णांकरिता स्वतंत्र शुल्क आकारणार, इक्बालसिंह चहल यांची माहिती)

“मविआ आघाडीची इंडिया आघाडी (india alliance) होऊ नये, हे आमचे बैठकीत ठरले आहे. आम्ही ती काळजी घेऊ. त्यामुळे ताक जरी असले, तरी फुंकून फुंकून प्यायचे असे मी ठरवले. जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यावर सध्या अर्धी चर्चा झाली असून अर्धी चर्चा बाकी आहे”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत बाजूलाच असतांना प्रकाश आंबेडकरांनी इंडि आघाडीविषयी हे खोचक विधान केले आहे.

महाविकास आघाडीची बैठक

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामावून घेतले जाणार का, यावरून प्रवेशावरून बरीच चर्चा रंगली होती. प्रकाश आंबेडकरांनी आपला बैठकीत अवमान झाल्याची तक्रारही बोलून दाखवली होती. त्यानंतर महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी इंडि आघाडीवर टीका केली आहे.

(हेही वाचा – BMC Budget 2024-25 : मुंबईकरांवर असा पाडला योजनांचा पाऊस)

“इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. अखिलेश यादव आणि काँग्रेस हे शेवटचे मित्र पक्ष राहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे दोघेही वेगळे झाले आहेत. दोघे वेगळ्या मार्गाने चालले आहेत, अशी माझी माहिती आहे. तसे होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. पण सत्य परिस्थिती तशी आहे”, असा दावाही त्यांनी या वेळी केला. (Prakash Ambedkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.