Prakash Ambedkar : महाविकास आघाडीची बैठक २८ फेब्रुवारीला घ्या, प्रकाश आंबेडकर यांची आघाडीला विनंती

२७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणे शक्य न होणार नाही.

127
Prakash Ambedkar: फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे-पवारांना इशारा
Prakash Ambedkar: फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे-पवारांना इशारा

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची २७ फेब्रुवारीला होणारी बैठक पुढे ढकलून ती २८ फेब्रुवारी घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी आज, २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. याबाबतची माहिती स्वतः आंबेडकर यांनी एक्स या समाज माध्यमातून दिली.

(हेही वाचा – Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनच एक महाकाव्य, माजी खासदार प्रदीप रावत यांचे वक्तव्य)

२७ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तयार होते. मात्र, २७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणे शक्य न होणार नाही. त्यामुळे बैठकीची तारीख जर २७ ऐवजी २८ होणार असेल तर आम्ही येऊ, असे आंबेडकर यांनी जयंत पाटील यांना कळवले आहे.

आम्ही २७ तारखेच्या बैठकीला येऊ शकत नाही. पुण्याला वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे. महाराष्ट्राची पूर्ण राज्य समिती पुण्यात असणार आहे. त्यामुळे २८ तारखेला बैठक शक्य होत असेल तर आपण तेव्हा येऊ, असा निरोप जयंत पाटील यांना दिल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.