Prakash Ambedkar नसतील तरी निवडणूक जिंकू : Sanjay Raut

Vanchit Bahujan Aghadi शिवाय निवडणूक लढण्याची महाविकास आघाडीची तयारी

204
Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत

महाविकास आघाडीमधून अखेर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच मविआनेही प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले की, ‘आंबेडकर नसतील तरी महाविकास आघाडी जिंकेल’. (Prakash Ambedkar)

आंबेडकर यांनी उबाठाचा प्रस्ताव फेटाळला

शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील दरी वाढत चालली असून यापुढे दोघांचे सूर जुळतील अशी चिन्हे नाहीत. उबाठा प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्याचा दावा केला आहे तर आंबेडकर यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. राऊत म्हणाले आम्ही चार जागांचा प्रस्ताव आंबेडकर यांना दिला असून तो स्वीकारायचा की नाकारायचा तो निर्णय त्यांचा आहे. असे असले तरी आंबेडकर यांनी हा प्रस्ताव सपशेल फेटाळला आहे. आंबेडकर यांनी शिवसेना उबाठासोबतची युतीही तुटल्याचे जाहीर केले असून केवळ काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले आहे. (Prakash Ambedkar)

(हेही वाचा – Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? )

मविआच्या मागे जनमत

आज सोमवारी २५ मार्चला पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवायही निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत नाहीत ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, यावर बोलताना राऊत “तरी आम्ही जिंकू,” असे उत्तर राऊत यांनी दिले. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट होत आहे. ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे. आंबेडकर सोबत असते तर मताधिक्य थोडं वाढलं असतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत. पण या महाराष्ट्रातल्या सोशित, वंचित, पिडीत जनतेला आमच्यासोबत घ्यावं आणि ही जनता आमच्याबरोबरच आहे आणि राहील.” (Prakash Ambedkar)

मंगळवारी उमेदवारांची घोषणा

दरम्यान, आज सोमवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री बंगल्यावर शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाची जागावाटपावर अंतिम चर्चा होणार असून वंचितशिवाय उद्या मंगळवारी २६ मार्चला १५-१६ उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे समजते. (Prakash Ambedkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.