“पक्षात विलीन व्हा सरकार स्थापन करू, भाजपची शिंदेंना अट?”; प्रकाश आंबेडकरांचं ट्विट

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. तर अद्याप त्यांनी भाजप सोबत जाण्याचा कोणताही निर्णय जाहीर केला नाही. दरम्यान, शिंदे गट आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, याबाबत सध्या संभ्रम असताना वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे.

असे आहे प्रकाश आंबेडकरांचं ट्विट

भाजपसोबत जाण्यास एकनाथ शिंदे आग्रही असून उद्धव ठाकरेंनी तर एकनाथ शिंदेंनी थेट सांगावं मी योग्य राज्य कारभार करत नाही, मी आता राजीनामा देईल, असे म्हटले. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केले आहे. यामध्ये असे म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?

(हेही वाचा – “वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!” बंडखोर आमदारांना ‘सामना’तून इशारा)

 

दरम्यान, शिंदे यांच्या बंडामागे भाजपची आणि त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप काय आणि कशी भूमिका घेणार, याविषयी फडणवीस यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here