Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्ला; टीकेची पातळी घसरली

Prakash Ambedkar : 'मोदी साहेब हिंदु धर्मात नाती महत्त्वाची आहेत. ⁠आपल्यासोबत आपल्या पत्नीला घ्या. हा खरे तर ⁠वैयक्तिक विषय आहे; मात्र संस्कृती आहे. ⁠आरएसएसने त्यांना सूचना करावी', असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

378
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्ला; टीकेची पातळी घसरली
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्ला; टीकेची पातळी घसरली

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे इंडि आघाडीची (India Alliance) पहिली प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत इंडि आघाडीतील राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते उपस्थित होते. या वेळी भाषण करतांना इंडि आघाडीत नुकतेच सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत व्यक्तीगत पातळीवर टीका केली. तसेच इंडि आघाडीत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये केली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदार मार्गदर्शिका प्रकाशित)

म्हणे, आरएसएसने त्यांना सूचना करावी

देश मेरा परिवार म्हणता, तर पत्नीला नांदवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना उद्देशून प्रकाश आंबेडकर म्हणाले. ‘मोदी साहेब हिंदु धर्मात नाती महत्त्वाची आहेत. ⁠आपल्यासोबत आपल्या पत्नीला घ्या. हा खरे तर ⁠वैयक्तिक विषय आहे; मात्र संस्कृती आहे. ⁠आरएसएसने त्यांना सूचना करावी’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

याच भाषणात इंडि आघाडीच्या नेत्यांना त्यांनी आवाहन केले की, सोबत असो वा नसो आपण एकत्र लढले पाहिजे. इंडि आघाडी मोदी सरकारच्या विरोधात एकत्र लढण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या पहिल्याच सभेत ‘सोबत असो वा नसो’, असे वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर यांनी संभ्रम निर्माण केला आहे.

(हेही वाचा – Shiv Sena Video : ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत सत्तापिपासू उद्धव ठाकरेंचा शिवसेनेने केला जाहीर निषेध)

द्रमुकला आणले अडचणीत

याच सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मित्रपक्ष असलेल्या द्रमुकलाही अडचणीत आणले आहे. ते म्हणाले की, ⁠काही कंपन्या आहेत की, त्यांच उत्पन्न 200 कोटी आणि इलेक्ट्रोरल बॉन्ड (Electoral Bond) हजार कोटी रुपयांचे खरेदी करतात. ज्या कंपन्यांचे प्रॉफिट 200 कोटी रुपये आहे, त्यांनी 1300 कोटींचे बाँड्स कसे दिले ?, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र यामुळे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुक पक्षाची आणि व्यासपिठावर असलेले स्टॅलिन यांची गोची झाली. कारण प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर यांनी उल्लेख केलेल्या फ्युचर गेमिंग कंपनीने द्रमुकला सर्वाधिक म्हणजे 531 कोटी रुपये दिली आहे. त्यामुळे भाजपऐवजी डीएमके आणि एम के स्टॅलिन (MK Stalin) हेच अडचणीत आले आहेत. (Prakash Ambedkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.