महाविकास आघाडीला जागांसह मसुदा दिला होता. या मसुद्या बाबत अद्याप महाविकास आघाडीने काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे याबाबत मविआ काय निर्णय घेते? त्यावरच आता सर्व अवलंबून आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट केली.
रविवार दि. ३ मार्चला शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही आघाडी समोर काही मुद्दे मांडले. ४८ जागांपैकी १५ जागांव ओबिसी उमेदवार द्यावा. (सर्व घटक पक्ष मिळून) ३ उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे द्यावेत तसेच आघाडीतील काही घटक पक्षाचा इतिहास लक्षात घेता, सेक्युलर मतदाराला आश्वासित करण्यासाठी यापुढे आम्ही भाजप सोबत युती करणार नाही, असे आश्वासित करावे. सेक्युलर मतदाराचे मत सेक्युलर पक्षालाच जाईल, याची शाश्वती मतदाराला द्यावी लागेल. याबाबतचा लेखी मसुदा जाहीर करावा, अशी भूमिका स्पष्ट केली होती, मात्र अद्याप याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे याबाबत आता मविआ काय भूमिका घेते? याकडे आमचे लक्ष लागले आहे. सकाळी केलेल्या ट्विटबाबत ते म्हणाले, अद्याप काहीही ठरलेले नसल्याने इतर पक्षाच्या बैठकीला कार्यकर्त्यांनी जाऊ नये; कारण कार्यकर्ते उत्साही असतात. त्यामुळे डोकेदुखी वाढते, यामुळेच हे ट्विट केले, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – Eknath Shinde: डोंबिवलीत मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन )
अद्याप मविआतील घटक पक्षात जागावाटप निश्चित झालेले नाही. कॉंग्रेस आणि शिवसेनेचे १५, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात ९ जागांचा गुंता सुटलेला नाही. हा गुंता ६ मार्चपर्यंत सुटला तर ठिकच आहे अन्यथा त्यानंतर भूमिका स्पष्ट करू. आम्ही मविआसोबत लढलो, तर महाराष्ट्रातील ४८ पैकी ४० जागा जिंकू आणि आम्ही स्वतंत्र लढलो तर सहा जागा निश्चित जिंकू, असा दावा करून ते म्हणाले. राज्यात वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत आहे; कारण यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजप-सेना सोबत लढले. भाजपने २३ जागा लढल्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस २००४ पासून एकत्र लढले आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात जो पक्ष कधी लढलाच नाही, त्या पक्षाच ताकत त्या जागेवर कमी आहे, हे सत्य लक्षात घेवूनच जागा वाटप होणे गरजेचे आहे. मात्र आमचा शेवट पर्यंत मविआ सोबत राहण्याचा प्रयत्न असेल, मात्र तुर्तास आम्ही आघाडीचे निमंत्रक आहोत की घटक याबाबत आम्हीही संभ्रमात असल्याचे अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शरद पवारांसोबत बैठक
सहा मार्च रोजी शरद पवार यांनी भेटीचे निमंत्रण दिले आहे. अद्याप स्थळ निश्चित झालेले नाही. मात्र त्यांच्या सोबत बैठकीला मी जाणार आहे, अशी माहितीही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
हेही पहा –