मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे इंडि आघाडीची (India Alliance) पहिली प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत इंडि आघाडीतील राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाषण करताना इंडि आघाडीत नुकतेच सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मित्रपक्षालाच अडचणीत आणले आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
ज्या कंपनीचे प्रॉफिट २०० कोटी रुपये आहे, त्या कंपनीने १३०० कोटींचे बाँड्स कसे दिले ?, असा प्रश्न आंबेडकर यांनी भाषणात उपस्थित केला. मात्र यामुळे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या द्रमुक पक्षाची आणि व्यासपीठावर असलेले स्टॅलिन यांची गोची झाली आहे; कारण प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर यांनी उल्लेख केलेल्या फ्युचर गेमिंग (Future Gaming) कंपनीने द्रमुकला सर्वाधिक म्हणजे ५३१ कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे भाजपाऐवजी डीएमके आणि एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) हेच अडचणीत आले आहेत.
(हेही वाचा – Bharat Dodo Nyaya Yatra: राहुल गांधी म्हणतात, भारत जोडो न्याय यात्रेतून मला जे मिळाले, मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही! )
द्रमुकला मिळाली सर्वाधिक देणगी
लॉटरी किंग सॅंटियागो मार्टिन फ्युचर गेमिंग ही कंपनी १, ३६८ कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची सर्वात मोठी खरेदीदार आहे. तिने सर्वाधिक देणगी द्रमुकला दिली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी स्टॅलिन व्यासपीठावर उपस्थित असतानाच केलेले हे वक्तव्य इंडि आघाडीत मीठाचा खडा टाकणारे तर ठरणार नाही ना, अशी चर्चा होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community