ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना गुरुवार, 31 डिसेंबर रोजी त्यांना पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रक काढत माहिती दिली. आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) प्रकृतीबाबत वंचितच्या अधिकृत एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील ३ ते ५ दिवस प्रकाश आंबेडकर हे डॉक्टरांच्या निरीक्षणात असणार आहेत, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभाग यांच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आपणच करणार असल्याचे रेखा ठाकूर म्हणाल्या.
(हेही वाचा विद्यमान आमदार Jayashree Jadhav यांचा काँग्रेसला धक्का; शिवसेना शिंदे गटात प्रवेश)
राज्यातील सर्व विभागांमध्ये बहुतांश मतदारसंघांमध्ये वंचितने उमेदवार दिले आहेत. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सर्व समाज घटकांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न केले आहेत. विविध समाज घटकांना त्यांनी वंचितची उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज व छाननीनंतर आता प्रचार मोहीम रंगात येणार आहे. त्यातच आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृती विषयी वृत्त समोर आले.
Join Our WhatsApp Community