क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर करण्यात आलेल्या कारवाईवरून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आहेत. राजकीय वर्तुळात देखील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहे. यावेळी ते असे म्हणाले होते की, समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्राचा वापर केला असा आरोप केला होता. या आरोपानंतर समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. अशातच आता वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी वानखेडेंची पाठराखण केली आहे.
(हेही वाचा – शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य भिकेत मिळालं नाही, राऊतांचा कंगनासह भाजपला टोला)
त्या मुलाला आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही
एखादा मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर त्या मुलाला आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकारणात निकाल दिला आहे. या निकालामुळे समीर वानखेडेंची बाजू भक्कम असून या प्रकरणात त्यांच्याच बाजून निर्णय येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले होते समीर वानखेडे
समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मी वयात आल्यानंतर वडिलोपार्जित धर्माचाच आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे, असे समीर वानखेडे म्हणाले. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहता या निर्णयाने वानखेडे योग्य आहे. वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असला तरी वयात आल्यानंतर मी हा धर्म स्वीकारलेला नाही, असेही वानखेडे यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार 18 वर्षाचा असेपर्यंत कोणताही मुलगा आई-वडिलांच्या ताब्यात असतो. ते त्याचे पालक असतात. पालक म्हणून आईवडिलांनी जे काही केलं ते त्याला लागू होतं असं नाही. त्याला त्याचा धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून वानखेडेच्या कास्ट आणि धर्माबाबतचा मुद्दा या निकालात पूर्णपणे कव्हरअप झाला असल्याचे आंबेडकर म्हणाले आहे.