महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिलेला असताना त्यावर महाविकास आघाडीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना महाविकास आघाडीत घेण्यास चालढकल केली जात असून त्यांना ताटकळत ठेवले आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) अवमान करीत असल्याने त्यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा विचार सोडून द्यावा आणि त्यांनी महाविकास आघाडीत जाण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुका लढाव्यात किंवा एनडीएत सहभागी होण्याचा विचार करावा, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शनिवारी (२० जानेवारी) प्रकाश आंबेडकर यांना दिला. (Ramdas Athawale)
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी युती केली आहे. आंबेडकर यांनी इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्याप तसा प्रतिसाद आलेला नाही. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना दोन पर्याय सुचवले आहेत. (Ramdas Athawale)
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमावर टीका करूनही उद्धव ठाकरेंना मिळाले सोहळ्याचे निमंत्रण )
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे. त्यांना महाविकास आघाडीत घ्यावे असा प्रस्ताव स्वतः प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीला दिला आहे. मात्र त्यावर महाविकास आघाडी निर्णय घेण्यात दिरंगाई करून त्यांना ताटकळत ठेवत आहे. हा प्रकार अवमानकारक वागणुकीचा आहे. त्यामुळे आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीत जाऊ नये. त्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढाव्यात किंवा एनडीए (NDA) मध्ये सहभागी होण्याचा विचार करावा, असे आठवले (Ramdas Athawale) यांनी शनिवारी सांगितले. (Ramdas Athawale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community