आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्याचसोबत बघायचे एकाकडे आणि हात द्यायचा दुसऱ्याला असे मी करत नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
२०२४ विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व निवडणुका एकत्र लढणार
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझा विश्वास कुणावर नाही असे नाही. जिथे जुळायचे असते तिथे १०० टक्के जुळले पाहिजे. बघायचे लेफ्टकडे आणि हात टाकायचा राईटकडे अशी जी व्यवस्था असते ती मला चालत नाही. मी महाविकास आघाडीचा अद्याप भाग नाही आणि माझी होण्याचीही इच्छा नाही. माझी युती शिवसेनेशी आहे. शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे हा त्यांचा प्रश्न आहे असे त्यांनी म्हटले. तसेच महाविकास आघाडीचा आमचा काही संबंध नाही. त्यामुळे निर्णयाचा संबंध नाही. मी कुणाच्या निर्णयाची प्रतिक्षा करत नाही. २०२४ विधानसभा निवडणुकीपर्यंत ज्या निवडणुका येतील त्या सगळ्या ठाकरे शिवसेना आणि आम्ही एकत्रित लढणार आहोत. ज्याने त्याने कोण कोणासोबत आहे हे पाहावे. मैत्री करायची तर ती प्रामाणिक करायचा. समझौता करायचा तर प्रामाणिक करायचा. समझौता करायचा नसेल तर करू नये. प्रत्येकाने आपापली भूमिका घ्यावी असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. ही युती म्हणते वंचित सोबत किंचित “प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबत उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेची युती म्हणजे. वंचित सोबत किंचित,” असे म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. वेळ आल्यावर कोणत्या जागा लढवायच्या तोही निर्णय घेऊ. दोघांची पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल, या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; आम्ही १३व्या मजल्यावरून महिलेला खाली फेकले नाही)
Join Our WhatsApp Community