महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. (Prakash Ambedkar)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील सहभागी होण्यासाठी अनुकूल आहे, मात्र जागावाटपाचा पेच कायम असल्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीतील घटकपक्ष नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचा – Pune: विद्यापीठ चौकातील रहदारीचे नियम पुन्हा बदलले, ‘या’ ठिकाणी ठराविक काळासाठी रस्ते बंद; जाणून घ्या सविस्तर)
आमची भूमिका ८ मार्चला जाहीर करू- प्रकाश आंबेडकर
त्यातच महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वर्धा जिल्हा कमिटीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मला एक पत्र लिहिलं आहे. त्यात एका उमेदवाराचं नाव सुचवलं. या जागेसाठी आपण महाविकास आघाडीत आग्रह धरावा, अशी विनंती जिल्हा कमिटीने केली आहे, मात्र जिल्हा कमिटीला उमेदवार ठरवण्याचे किंवा जाहीर करण्याचे अधिकार नाहीत, त्यांनी फक्त नाव सुचवलं आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली असून सांगलीबाबत आमची भूमिका ८ मार्चला जाहीर करू. महाविकास आघाडी व्हावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू, मात्र महाविकास आघाडी न झाल्यास राज्यात भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना होईल, असेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
चर्चा फेटाळून लावल्या
‘मी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे, मात्र माझ्याव्यतिरिक्त वंचितकडून अन्य कोणत्याही उमेदवारांची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही’, असा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला केला आहे. वंचित आघाडीने अकोल्यासह वर्धा आणि सांगलीसाठी आपला उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात होतं, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
हेही पहा –