Prakash Ambedkar : पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांबरोबर आम्ही नाही- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला अपमान करायचा तसंच पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नसल्याचं स्पष्ट वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

276
Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत मतभेद कायम; प्रकाश आंबेडकर म्हणाले...
Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत मतभेद कायम; प्रकाश आंबेडकर म्हणाले...
एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला अपमान करायचा तसंच पाडापाडीच राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नसल्याचं स्पष्ट वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडी मधील वंचितचे भवितव्य कुठेतरी संपल्याचे दिसून येत आहे. (Prakash Ambedkar)
महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar), काँग्रेस (Congress) आणि वंचित आघाडीसह (Vanchit Bahujan Alliance) तयार झालेली महाविकास आघाडी मध्ये आता कुठेतरी बिघाडी झाल्याचे चित्र समोर येत आहे. जागावाटप अजूनही पूर्ण झालेले नसताना शिवसेना उभाठा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी समोर चार जागांचा पर्याय समोर दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला गृहीत धरू नये तसेच पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नसल्याचे स्पष्ट केले. आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नसल्यामुळेच कुठेतरी आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र समोर येताना दिसत आहे. राज्यात महायुती समोर लोकसभेला महाविकास आघाडी असे चित्र तयार करण्यात आले होते. परंतु प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या या वक्तव्यानंतर येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये राहील की नाही यावर साशंकता निर्माण झाली आहे. या आधी देखील प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाक्य युद्ध पाहण्यास मिळाले आहे.  (Prakash Ambedkar)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.