काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांनी विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे मोठा वाद पेटला आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असताना कर्नाटकातील प्रखर हिंदुत्ववादी नेते आणि श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक (Pramod Mutalik) यांनी थेट प्रियांक खारगे यांना आव्हान दिले आहे. हिम्मत असे तर मंत्र्यानी बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये लावण्यात आलेली वीर सावरकर यांची प्रतिमा काढून दाखवावी, सगळ्या बेळगावात रान पेटवू, असे मुतालिक म्हणाले.
काय म्हणाले प्रमोद मुतालिक?
वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. अंदमानात असताना त्यांचा छळ होऊनही दाद दिली नाही. प्रियांक खरगे यांनी वीर सावरकरांचा इतिहास समजून घेऊन बोलावे. वीर सावरकर त्यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही. हुबळी येथील मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाग घेऊन समाजाला दहा हजार कोटी रूपये देण्याचे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांनी मालमत्ता असल्यासारखे बोलू नये. मतांसाठी उधळपट्टी करण्याला आक्षेप आहे, असेही प्रमोद मुतालिक (Pramod Mutalik) म्हणाले.
Join Our WhatsApp Community