प्रसाद लाड यांचे Manoj Jarange Patil यांना आव्हान; म्हणाले…

227
प्रसाद लाड यांचे Manoj Jarange Patil यांना आव्हान; म्हणाले...

मराठा समाजासाठी ६० वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय नाही केले यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हान भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दिले. (Manoj Jarange Patil)

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर कडाडून टीका केली आहे. यावर प्रसाद लाड यांनी फडणवीस यांचा बचाव केला. त्यामुळे भडकलेल्या जरांगे पाटील यांनी लाड यांना शिवीगाळ केली. तसेच पोलीस भरतीमध्ये परभणीच्या मराठा तरुणाला ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांनी डावलल्याचा आरोप केला होता. यावर आता प्रसाद लाड यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत जरांगे यांना सुनावले आहे. (Manoj Jarange Patil)

मिस्टर जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, ‘नरेटिव्ह’ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या’ असे सांगत लाड यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिले. (Manoj Jarange Patil)

(हेही वाचा – Microsoft Windows Crowdstrike : ब्लू स्क्रीन ऑफ डेथ; मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे कोणत्या कोणत्या सेवा झाल्या प्रभावित ?)

लाड म्हणाले, हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी ६ जून २०२४ च्या जाहिरातीनुसार २०२३-२०२४ चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. परंतु त्यांच्याकडे २०२४-२५ या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले. (Manoj Jarange Patil)

आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी ६० वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या, असे आव्हान प्रसाद लाड यांनी केले. (Manoj Jarange Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.