भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange) हल्लाबोल केला आहे. तू कुणालाही पाडण्याचा ठेक घेतला आहे का? हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे कर. असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी जरांगेंना मराठा समाजातून मिळणारा पाठिंबा कमी झाल्याचा दावाही केला. प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(हेही वाचा –Crime : मुंबईत मठाधिपती माधवाचार्यांवर अज्ञातांकडून पूजा सुरू असताना प्राणघातक हल्ला)
प्रसाद लाड म्हणाले की, “तु काय ठेका घेतला आहे का याला पाडणार त्याला निवडून आणायचे. एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावे निवडणूक लढवावी आणि आपले 288 उमेदवार उभे करावे.” असे आव्हान प्रसाद लाड यांनी दिले आहे. मराठा आंदोलनासाठी त्यांनी लढावे, त्यांच्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि राहिल असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी आपल्या बेमुदत उपोषणाला स्थगिती दिली आहे. (Manoj Jarange)
(हेही वाचा –Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा टेक ऑफ करताना भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती)
पुढे ते म्हणाले की, लोकांचे लक्ष विचलित करायचे म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे. अटक वॉरंट हे न्यायालयातून निघत असते. त्यांचा मान सन्मान राखायला पाहिजे. 2013 मध्ये लोकांचे पैसे खाल्ले असेही लाड यांनी म्हटले आहे. निजामाने मनोज जरांगे यांना काय सर्टीफीकेट दिले आहे का कोण मराठा आहे की नाही हे ठरवण्याचे. तर मनोज जरांगे पाटील दादा आता हे मोघलाई कडे निघाले आहेत. ते राजकारणात चालले हे आता स्पष्ट झाले आहे. मी जातीवंत मराठा आहे. माझ्या पणजोबाच्या नोंदी सापडल्या त्यामुळे आम्ही ओबीसी झालो. मनोज जरांगे यांचे पण सर्टीफीकेट सापडले. मग तुम्ही त्यांना विचारा ते मराठा आहेत की ओबीसी? असा सवाल लाड यांनी केला आहे. (Manoj Jarange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community