प्रशांत किशोरांनी अखेर काँग्रेससमोर हात टेकले

126

काँग्रेस पक्षाला सध्या उतरती कळा लागली आहे आणि भाजपच्या विजयरथ थांबवायचा असेल तर काँग्रेससारखा देशातील कानाकोपऱ्यात पसरलेल्या काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे. म्हणूनच देशातील विरोधी पक्षांतील सर्व प्रादेशिक पक्ष काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात आता निवडणुकांतील रणनीतीकार प्रशांत किशोर यानीही विशेष प्रयत्न केले. त्यासाठी काँग्रेसला कोणत्या विषयात सुधारणा करणे आवश्यक आहे, हे समजवणारे ६०० स्लाईड्सचे प्रेझेन्टेशन तयार केले, मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आता प्रशांत किशोर यांनीही अखेर काँग्रेससमोर हात टेकले आहेत.

काँग्रेसच्या अनास्थेवर नाराजी  

प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणनीती ठरवली, तेव्हापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेले किशोर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांसाठी रणनीती आखली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेससाठी रणनीती ठरवली. आता किशोर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कुणाची रणनीती ठरवणार, यावर चर्चा सुरु झाली असताना प्रशांत किशोर यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला बळ देण्याशिवाय पर्याय नाही, असे किशोर यांनी ओळखले. म्हणून मिशन २०२४ साठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. किशोर यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात प्रेझेंटेशन दिले, परंतु ६०० स्लाईड्सपैकी अवघ्या ६६ स्लाईड्स सोनिया गांधींनी पाहिल्या, त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. अखेर काँग्रेसमध्ये कमालीची अनास्था पाहून प्रशांत किशोर यांनी आपण काँग्रेसमध्ये सामील होण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती ट्विटद्वारे दिली.

(हेही वाचा सदावर्तेंना जामीन मिळताच जयश्री पाटील प्रकटल्या )

काँग्रेसची रणनीती ‘हे’ ठरवणार 

जमिनी स्तरावरील संघटनात्मक समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन घडवणाऱ्या सुधारणांची आवश्यकता आहे, असे किशोर यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे धोरण निश्चित करण्याचे काम सक्षमीकरण कृती गट करणार आहे. काँग्रेसच्या भवितव्याचा विचार करून ६ समित्या तयार करण्यात आल्या. या समित्यांचे संयोजकपद मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, पी. चिदंबरम, मुकूल वासनिक, भूपिंदर सिंह हुड्डा आणि अमरिंदर सिंह वारिंग यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.