विरोधकांना भाजपाचा विजयरथ रोखण्याच्या अनेक संधी होत्या, परंतु चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी सर्व संधी गमावल्या. भाजपा तेलंगणातील पहिला किंवा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, ही मोठी गोष्ट आहे. भाजपा ओडिशातही जास्तीत जास्त जागा जिंकेल. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप क्रमांक एकचा पक्ष होण्याची दाट शक्यता आहे. तामिळनाडूमध्येही भाजपची मतांची टक्केवारी दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकते, असा दावा निवडणुकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केला.
400 पार कठीण
प्रशांत किशोर (Prashant Kishor) पुढे म्हणाले, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 204 जागा आहेत, परंतु या भागांमध्ये भाजपाला 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने या भागात 29 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 47 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपा 370 जागा जिंकू शकत नाही, त्यांनी फक्त निवडणुकीसाठी एक लक्ष्य ठेवले आहे. भाजपाने गेल्या काही वर्षांत दक्षिण आणि पूर्व भारतात मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मोदी आणि अमित शहा यांसारखे भाजपा नेते वारंवार या राज्यांना भेट देत आहेत, असेही .
Join Our WhatsApp Community