प्रताप सरनाईक पुन्हा ED च्या रडारवर? 11 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार

156

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते अडचणीत आले होते. मात्र शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. दरम्यान, ईडी कारवाई होऊ नये म्हणून आपण शिंदे गटाला पाठिंबा देत आहोत, असे संकेतही प्रताप सरनाईकांनी दिले होते. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्यावर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे. शिवसेनेत असल्याने भाजपाने सुडबुद्धीने ईडीची कारवाई केल्याचे आरोप करणाऱ्या सरनाईकांची शिंदे गटात जाऊनही ईडी त्यांची संपत्ती जप्त करणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – आता ITR भरण्यासाठीची मुदत वाढवली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार कर )

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेले होते. त्यात प्रताप सरनाईक देखील होते. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर ईडीने छापेमारी करण्यात आली होती. यानंतर शिवसेनेचे नेते त्यांची बाजू मांडत होते. परंतू नंतक त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने ते नाराज होते. याकारणानेच सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने त्यांची ईडी कारवाई थांबली, असा सवाल शिवसेनेतून उपस्थित केला जात होता.

मात्र आता पुन्हा प्रताप सरनाईकांची ईडी चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईकांची ११ कोटींची संपत्ती ईडीकडून ताब्यात घेतली जाणार आहे. सरनाईकांचे ठाण्यात दोन फ्लॅट आहेत, तर मीरारोड येथेही एक प्लॉट आहे. ही मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात येणार आहे. आता एनएसईएल घोटाळा प्रकरणी ईडी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईकांच्या संपत्तीचा ताबा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.