प्रताप सरनाईकांच्या पुत्राला युवासेनेच्या कार्यकारिणीतून वगळले, नेमके कारण काय?

103

प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ताज्या वादाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असतानाच पूर्वेश सरनाईक यांना युवासेनेच्या कार्यकारिणीतून वगळल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

( हेही वाचा : पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठा बदल; मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी, एकूण फेऱ्यांची संख्या १३८३)

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक पावसकर यांनी शुक्रवारी युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली. आदित्य ठाकरे यांची साथ सोडून आमच्याकडे आलेल्या सर्व युवासैनिकांच्या जबाबदाऱ्या कायम ठेवल्या जातील, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. त्याप्रमाणे आधीच्या पदाधिकाऱ्यांकडील जबाबदाऱ्या कायम ठेवण्यात आल्या.

मात्र, त्यात पूर्वेश सरनाईक यांचे नाव नव्हते. प्रताप सरनाईक यांच्यासोबत तेही शिंदे गटात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेत त्यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी होती. शिंदे गटाच्या युवसेनेत त्यांना ही जबाबदारी पुन्हा दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, यादीत त्यांचे नावच नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

New Project 13

कारण काय?

प्रताप सरनाईक यांचा ओवळा-माजिवडा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. सरनाईक यांच्या कानावर ही गोष्ट पडताच त्यांनी थेट शिंदे यांना फोन करून जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये खटका उडल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी पूर्वेश सरनाईक यांचा युवासेनेतील पत्ता कापला गेल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.