प्रताप सरनाईकांना शिवसेनेतील ‘ही’ व्यक्ती देते ऑक्सिजन

70

शिवसेनेचे नेते सध्या ईडीच्या रडारवर असून, काही दिवसांपूर्वीच या ईडीच्या ससेमिऱ्याला कंटाळून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सतत त्रास दिला जात आहे. या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. मात्र आता सरनाईक यांनी मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात, असे चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचं लोकार्पण करण्यात आलं. प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. यावेळी प्रताप सरनाईक यांनी मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात असे चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले.

(हेही वाचाः हा स्वातंत्र्याचा नाही जीविताचा प्रश्न आहे… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले)

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

मुख्यमंत्री साहेब तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आजपासून या प्लँटचे लोकार्पण झाल्यामुळे ते कार्यरत होत आहेत. याठिकाणी आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. खासकरुन संजय राऊत साहेब यांचे. मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात. आता दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

…म्हणून सरनाईक ईडीच्या रडारवर

सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) नोव्हेंबर २०२० मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

(हेही वाचाः निवडणुका आणि लॉकडाऊनवरुन राज ठाकरेंचा सरकारवर खळबळजनक आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.