संभाजी भिडे गुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर झालेला प्रकार सर्वांनाच ठाऊक आहे. एका पत्रकार तरुणीने संभाजी भिडे गुरुजींना प्रश्न विचारल्यावर त्यांनी तिला कुंकू/टिकली लावण्याचा सल्ला दिला. यावरुन सेक्युलर विश्वाने रान उठवलं. भिडे गुरुजींवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. परंतु भिडे गुरुजी मुख्यमंत्र्यांना का भेटले असतील याचा कोणी विचार केला नाही.
( हेही वाचा : दिल्लीत डेंजर झोन! ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता?)
एक काळ होता जेव्हा डाव्या चळवळीत बुद्धिमान लोक वावरायचे. आता डावे व्हायची महत्वाची अट म्हणजे अकलेचे कांदे! ज्याच्याकडे बुद्धी नाही, ज्याला बोलता येत नाही व केवळ बरळता येते अशा लोकांना या गटात प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे कोणत्या गोष्टीवर टीका करावी आणि कोणती गोष्ट सोडून द्यावी याचं भान राहत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी भिडे गुरुजींची भेट नाकारली होती.
भिडे गुरुजी हे कुणी सामान्य माणूस नाहीत. जरी ते सामान्य आयुष्य जगत असले तरी ते अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कुणाची भेट घेतली तर त्यास मोठे महत्व असते. परंतु सेक्युलर लोकांना यातले गांभीर्य आता राहिलेले नाही. त्यांनी टिकली/कुंकूवरुन गुरुजींना ट्रोल केलं. एक साधी गोष्ट आहे. गुरुजींनी वयाची ८० – ८५ शी पार केली आहे. एखादा १० वर्षांचा मुलगा घेतला तर गुरुजी वयोमानाने त्यांच्या पणजोबांपेक्षाही मोठे असतील. म्हणजे एवढी ज्येष्ठ व जुनी व्यक्ती. त्या व्यक्तीला आपल्या संस्कृतीविषयी जास्त प्रेम असेल तर यात वावगं काय आहे. यात वाद घालण्यासारखं काय आहे. आपल्या नातीच्या वयाच्या मुलीला गुरुजी कुंकू लावलं तरच मी तुला उत्तर देईन असं म्हटलं, तर कोणतं मोठं डोंगर कोसळलं. त्यांनी कोणतीही बळजबरी केली नव्हती किंवा तू कुंकू लावलंच पाहिजे असा दब देखील दिला नव्हता. गुरुजी हे बोलले ते त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं.
आता मूळ मुद्दा असा की ज्यावेळी गुरुजी मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी, मला उद्धव ठाकरेंनी नाकारलेली भेट आठवली. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी गुरुजींच्या आदेशाखातर रायगडावर येतात, अशा ज्येष्ठ व्यक्तीची भेट ठाकरेंनी घेतली नाही. हे सेक्युलर किंवा चाय बिस्कुट यांच्या लक्षात आलं नाही. आणि आता प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफलखान कबरीभिवतीच्या अनधिकृत बांधकामावर या सरकारने हातोडा मारला आहे. महत्वाचे म्हणजे न्यायालयाकडून अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश केव्हाच देण्यात आले होते. मात्र सरकारने याकडे कानाडोळा केला होता.
शिंदे-फडणवीस सरकारद्वारे शिव प्रताप दिनाचे औचित्य साधून महसूल विभाग आणि वनविभागाकडून या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अफझलखानच्या कबरीच्या बाजूला सात खोल्या आहेत, कबरीसमोर हॉल आहे, मुजावरांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था असून आठ गुंठे अधिकृत बांधकाम केले आहे. मग प्रश्न असा पडतो अशा वेळी स्वयंघोषित शिवप्रेमी जितेंद्र आव्हाड यांचं शिवप्रेम जातं कुठे? असो!
भिडे गुरुजी मुख्यमंत्र्यांना भेटले, या मागचा हा अर्थ होता. गुरुजींसमोर मोठं ध्येय आहे, सेक्युलर उगाच टिकली/कुंकूमध्ये समाधान मानतात.
Join Our WhatsApp Community