विजयी चौकार मारणा-या शिवसेनेच्या Prataprao Jadhav यांना केंद्रीय मंत्रीपद

प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे.

210

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही मंत्र्यांनी शपथ घेतली. रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील मोजक्या खासदारांचा समावेश आहे. त्यात प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी मिळाली. त्यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ देण्यात आली. 2004 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले, २०२४ चा हा त्यांचा सलग चाैथा विजय आहे.

शिवसेनेचे खासदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवली. बुलढाण्याचा गड अभेद्य राखणाऱ्या प्रतापराव जाधव यांनी विजय संपादन केला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करून सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकली. प्रतापराव जाधव हे सर्वात वरिष्ठ आणि सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे.

(हेही वाचा जितन मांझी एकमेव खासदार तरीही कॅबिनेट मंत्रिपद; Modi 0.3 मधील लक्षवेधी निर्णय)

खासदार प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास

प्रतापराव गणपतराव जाधव यांचा जन्म बुलढाणा येथील मेहकर येथे 25 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. त्यांनी बी.ए (द्वितीय वर्ष) पर्यंत शिक्षण घेतलं आहे. शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. प्रतापराव जाधव हे एक समर्पित आणि सुलभ राजकारणी म्हणून ओळखले जातात. तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वश्रुत आहे.

प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते सुरूवातीपासूनच शिवसेनेत आहे. प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधला आहे. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.