Prataprao Jadhav केंद्रीय मंत्रीपदी; सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास आता दिल्लीपर्यंत!

213
Prataprao Jadhav केंद्रीय मंत्रीपदी; सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास आता दिल्लीपर्यंत!
Prataprao Jadhav केंद्रीय मंत्रीपदी; सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास आता दिल्लीपर्यंत!

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपप्रणित एनडीएला (NDA) बहुमत (Prataprao Jadhav) मिळालं. आज (९ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Oath Ceremony) यांच्यासह काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश असून एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. तर आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. तर मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

(हेही वाचा –Murlidhar Mohol: “खासदार म्हणून दिल्लीत आलो आणि…”, मोहोळ झाले भावूक!)

शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचीही मंत्रीमंडळात वर्णी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवली. बुलढाण्याचा गड अभेद्य राखणाऱ्या प्रतापराव जाधव यांनी विजय संपादन केला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करून सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकली. त्यामुळे जाधव यांचीही केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. प्रतापराव जाधव हे सर्वात वारिष्ठ आणि सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे. (Prataprao Jadhav)

राजकीय प्रवास कसा होता ?

प्रतापराव गणपतराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा जन्म बुलढाणा येथील मेहकर येथे 25 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. त्यांनी बी.ए (द्वितीय वर्ष) पर्यंत शिक्षण घेतलं आहे. शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. प्रतापराव जाधव हे एक समर्पित आणि सुलभ राजकारणी म्हणून ओळखले जातात. तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वश्रुत आहे. (Prataprao Jadhav)

1995 ते 2009 – आमदार , मेहकर विधानसभा

1997 ते 1999 – क्रीडा राज्य मंत्री . महाराष्ट्र राज्य.

2009 – बुलढाणा लोकसभा मतदार संघातून शिवसेना कडून खासदार म्हणून निवड.

2009 ते 2024 सलग चार वेळा बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजय.

2009 ते 2024 – अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.