भगवान धन्वंतरीची विधीवत पूजा करून ‘देशातील नागरिकांना निरोगी आरोग्य लाभू दे’, अशी धन्वंतरी चरणी प्रार्थना करून भारताच्या आयुष मंत्रालयाचा पदभार नामदार प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी, (११ जून) स्वीकारला. (Ministry of AYUSH)
दिल्ली येथील आयुष मंत्रालयात असलेल्या भगवान धन्वंतरी प्रतिमेची विधीवत पूजा नामदार प्रतापराव जाधव आणि राजश्री जाधव यांनी मंगळवारी केली. त्यांनतर आयुष मंत्रालयाचा पदभार नामदर प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्यराज कोटेचा संयुक्त सचिव भावना ससेन्सा उपस्थित होत्या. योगाच्या माध्यमातून निरोगी आयुष्यची देण मणुष्याला मिळल्याने योगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. (Ministry of AYUSH)
(हेही वाचा – Versova Unauthorised Construction : वेसावे शिव गल्लीतील आणखी एक अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त )
निरोगी आरोग्यासाठी योग साधना…
विदेशातील लोकसुद्धा निरोगी आरोग्यासाठी योग साधना नियमित करतात. एवढं योगाला महत्त्व आहे. भारतात योग, आयुर्वेदच्या माध्यमातून चांगलं आणि गुणात्मक काम करणार असल्याचं आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला. (Ministry of AYUSH)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community