रुग्णालयातील आगी म्हणजे सरकारचा ढिसाळ कारभार!

गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या आगीच्या दुर्घटनांच्या चौकशा करण्यात आल्या, त्यामध्ये नेमके काय झाले, अशी विचारणा दरेकर यांनी केली.

137

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी व संतापजनक आहे. सरकारच्या ढिसाळ कारभाराचा हा नमुना आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडलेली ही दुर्घटना निषेधार्ह आहे, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

आरोग्य व्यवस्थेचे दुर्लक्ष

आता ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली जाईल. पण आगीच्या या घटना वारंवार घडत आहेत. भंडारामधील आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. विरारला विजय वल्लभ हॉस्पिटलाची आगीची दुर्घटना, मुलुंडमधील ड्रीम मॉलमधील आग, नाशिकला प्राणवायु गळतीमुळे अनेकांना आपले जीव गमावावे लागले. प्रत्येक वेळी सखाेल चौकशी करण्याचे आदेश सरकार देते. पण अशी दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सरकारकडून केल्या जात नाही. यावरुन या सरकारचे आरोग्य व्यवस्थेमध्ये किती लक्ष आहे हे दिसून येते, असेही दरेकर म्हणाले.

(हेही वाचा : पुन्हा रुग्णालयाला आग! नगरमध्ये १० रुग्णांचा मृत्यू)

आजवरच्या आगींच्या चौकशीचे काय?

तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या आगीच्या दुर्घटनांच्या चौकशा करण्यात आल्या, त्यामध्ये नेमके काय झाले, याचा लेखाजोखा महाराष्ट्रातील जनतेसमोर यायला हवा. कारण मृत्युचे तांडव हे अशा प्रकारच्या दुर्घटनेतून होत आहे, पण संवेदनहीन सरकारकचे याकडे लक्ष नाही, त्यामुळे किमान सरकारने आता तरी जागे व्हावे व अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.