भाजपा नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडला आहे. त्यांना आता सत्तेची आस लागलेली आहे. त्यातून ते कोणाची बाजू धरत आहेत, हे अगदी स्पष्ट झालेले आहे. त्यांच्या नौंटकीपुढे मराठा समाज आता झुकणार नाही. दुसरे म्हणजे जरांगेंकडे लोकांची गर्दी कमी झालेली असून लोकांचा पाठिंबा मिळत नाही म्हणून त्यांना प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आता जेलमध्ये जाण्याची घाई झालेली आहे, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला.
…त्या दिशेने जरांगे यांचे पाऊल पडत आहे
प्रवीण दरेकर म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांच्यावरील मराठा समाजाचा विश्वास गेलेला आहे. त्यांची सुरूवातीची भाषा कुणबी नोंदीच्या संदर्भात होती. त्यात देखील सरकारने पुढाकार घेतला. त्यानंतर सगेसोयरेचा विषय आला. त्यावर देखील सरकारने सकारात्मकता दाखविली. त्या दृष्टीने कामे देखील सुरू झालेली आहेत. परंतु, आता महाविकास आघाडीला विधानसभेत कशी मदत होईल, त्या दिशेने जरांगे यांचे पाऊल पडत आहेत.” (Manoj Jarange)
जरांगे यांच्या नौटंकीला आता मराठा समाज झुकणार नाही
“जरांगेंच्या चर्चेच्या फेऱ्या या आंदोलनातील मागणीसंदर्भात व्हायला पाहिजे. परंतु त्यांच्या फेऱ्या आता राजकारणाच्या भाषेच्या होत आहेत. आंदोलन सुरू झाले तेव्हापासून राजेश टोपे व त्यांचा कारखाना त्या ठिकाणी झालेल्या बैठका यावरुन अगदी चित्र स्पष्ट झाले आहे की, जरांगे यांचा नेमका पाठिंबा कोणाला आहे. परंतु जरांगे यांच्या नौटंकीला आता मराठा समाज झुकणार देखील नाही. माझ्यावर कोणी बोलायचे नाही आणि बोलले तर त्याच्या व्यक्तिगत जीवनावर टीका करायची ही त्यांची अहंकारी भाषा आता मराठा समाजाला देखील कळाली आहे.” (Manoj Jarange)
“मनोज जरांगे यांना आता सत्तेची आस लागलेली आहे. महाविकास आघाडीची सुपारी घेतली असल्याचे त्यांचा विधानातून अगदी स्पष्ट होत आहे. परंतु या नौटंकीबाज माणसापुढे आता मराठा समाज झुकणार नाही, कारण त्यांनी विश्वास गमावलेला आहे.” असाही घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला. (Manoj Jarange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community