सोमय्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा कट! दरेकरांचा आरोप

खासदार भावना गवळी यांच्यासंबंधित प्रकरणाविषयी सोमय्या वाशिमला गेले, अनिल परब यांच्या संदर्भातही ते रत्नागिरी येथे गेले, दोन्ही ठिकाणाहून ते सुरळीत जाऊन आले. मग कोल्हापुरात नेमके घडले की, मुश्रीफ यांना हजारोंचा समुदाय रस्त्यावर उतरवावा लागला, असे दरेकर म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे की, सर्व बाबतीत कायदेशीर लढाई लढायला आम्ही पण तयार आहे. कर नाही तर डर कशाला. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रकरणे काढली म्हणून आता आमच्या पक्षांच्या नेत्यांचे खोदकाम सुरू आहे, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की, किती खोदकाम केले तरी भारतीय जनता पक्षाची प्रकरणे सापडणार नाहीत, कर नसेल तर डर असायचे कारण नाही. त्यामुळे भाजप अशा प्रकारच्या धमक्यांना भीक घालत नाही, असे

आव्हान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. 

कोल्हापुरातच काय घडले? खासदार भावना गवळी यांच्यासंबंधित प्रकरणाविषयी सोमय्या वाशिमला गेले होते. अनिल परब यांच्या संदर्भातही ते रत्नागिरी येथे गेले होते. दोन्ही ठिकाणी सुरळीत जाऊन आले, मग कोल्हापुरात नेमके काय आहे की, मुश्रीफ यांना हजारोंचा समुदाय रस्त्यावर उतरवावा लागला. तसेच जिल्हाधिका-यांनी काढलेल्या ऑर्डरमध्ये सोमय्या यांच्या जीविताला धोका असल्याचे का नमूद केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा : सोमय्यांवरील कारवाईची निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी! भाजपाची मागणी)

कोल्ह्यापुरात सोमय्यांच्या विरोधात कट होता का? 

गृहमंत्री दिलिप वळसे-पाटील म्हणाले की, अशा प्रकारच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांना कळवले जाते. जिल्हाधिकारी स्तरावरची ही कारवाई आहे. त्यामुळे आम्हाला कळवले नव्हते. तर शिवसेना खासदार संजय राऊत एका बाजूला बोलतात की, मुख्यमंत्री कार्यालयाला यासंदर्भात काही माहिती नव्हती. मुख्यमंत्र्यांचा या सर्वाशी काही संबंध नाही. गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे या दोन्ही पक्षांत किती आलबेल आहे, हे उघड होते, असे दरेकर म्हणाले. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये नमूद केले की, किरीट सोमय्या यांच्या जिवाला धोका आहे, मग कोल्हापूरमध्ये जमाव निर्माण करून सोमय्या यांच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा कट होता का, असा संशय निर्माण होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here