बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल झालेले विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना न्यायालयाने शुक्रवारपर्यत अटकेपासून दिलासा दिला आहे. दरेकर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून २५ मार्च रोजी सुनावणीवर निर्णय देण्यात येणार आहे.
बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल
बोगस मजूर प्रकरणी मागच्या आठवड्यात माता रमाबाई आंबडेकर मार्ग पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणूक, बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून शुक्रवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. या अटकपूर्व जामिनावर शुक्रवार, २५ मार्च रोजी न्यायालय आपला निर्णय देतील, तोपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.