विधानसभा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना न्यायालयाच्या आदेशानुसार अटक करून ३५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. ९०४ पानांच्या दोषारोप पत्रात प्रवीण दरेकर यांच्यासह तिघांना त्यात आरोपी दाखविण्यात आले आहे.
बोगस मजूर प्रकरणात विधानसभेचे विरोधी नळ पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने दरेकरांना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर अटक करण्यात आल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी प्रवीण दरेकर यांना अटक करण्यात आली होती, दरेकर यांच्या वकिलांनी जामीनाची कागदपत्रे सादर केल्यानंतर पोलिसांनी ३५ हजार रुपयांच्या जातमुचलकल्यावर तासाभरात त्यांना जामीन देऊन त्यांची सुटका करण्यात आली. दरेकर यांना जामीन दिल्यानंतर पोलिसांनी प्रवीण दरेकर यांच्यासह तीन जणांच्या विरोधात ९०४ पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या दोषारोपपत्रात २९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यात तीन पोलीस अधिकारी, एक उपजिल्हाधिकारी,सरकारी कर्मचारी आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
काय होते प्रकरण …
आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोप केला आहे की, दरेकर यांनी १९९७ मध्ये कामगार सहकारी संस्थेमध्ये मजूर म्हणून नोंदणी केली होती. या नोंदणीचा वापर करून दरेकरांनी बँकेची निवडणूक लढवली होती आणि १० वर्षे अध्यक्षपद भूषवले होते. विधानपरिषद (एमएलसी) सदस्य म्हणून निवडून आल्यानंतरही दरेकरांनी कामगार म्हणून काम करत कामगार सोसायटीचे सदस्यत्व कायम ठेवले, असे तक्रारीत म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community