अरविंद केजरीवालांच्या नौटंकीची दिल्लीच्या जनतेकडून चिरफाड; Pravin Darekar यांचा प्रहार

118
अरविंद केजरीवालांच्या नौटंकीची दिल्लीच्या जनतेकडून चिरफाड; Pravin Darekar यांचा प्रहार
  • प्रतिनिधी

आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्यावरील आरोप दिल्लीकरांना पटले, म्हणूनच केजरीवालांच्या साधेपणाच्या नौटंकीचा पर्दाफाश दिल्लीकरांनी केला, असा जोरदार प्रहार भाजपाचे विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या पराभवाची काय आहेत कारणे?)

भाजपाच्या विजयाचा दिल्लीपर्यंत प्रभाव

आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, दिल्लीत मिळालेला विजय हा अत्यंत दैदिप्यमान आहे. देशभरात भाजपाच्या विजयाची लाट असताना, फक्त दिल्लीमध्येच भाजपाची सत्ता नव्हती. मात्र, गेल्या दहा वर्षांत अरविंद केजरीवाल यांनी साधेपणाचा आव आणून नौटंकी केली, त्याची चिरफाड जनतेने केली आहे. केजरीवाल यांनी स्वतःला एकमेव प्रामाणिक नेता दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी असल्याचे भासवले.

पण सत्य वेगळे होते. दारू घोटाळ्यासह अन्य भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात जावे लागले. यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झाला आणि जनतेने त्यांना पराभूत केले, असेही दरेकर (Pravin Darekar) यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – भाजपाच्या विजयावर मुख्यमंत्री Yogi Adityanath यांचे विधान; म्हणाले, “दिल्लीत खोटेपणा आणि लुटीच्या राजकारणाला पूर्णविराम”)

काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण

काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “जसा राजा तशी प्रजा!” काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना स्वतःच्या पक्षातील लोकच गंभीरपणे घेत नाहीत, तर जनता तरी त्यांना कशी गांभीर्याने घेईल? नेतृत्वात आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी असावी लागते, जी राहुल गांधींकडे नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, भाजपाचे नेतृत्व – पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा – हे सर्व नेते सातत्याने मेहनत घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तीन दिवस दिल्लीमध्ये राहून प्रचाराचे नेतृत्व करत होते. त्यांनी मोठ्या सभा घेतल्या, प्रचारयात्रांमध्ये भाग घेतला आणि प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला. याउलट काँग्रेसमध्ये अशी मेहनत आणि समर्पण दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती देशभर ढासळत चालली आहे आणि दिल्लीमध्ये तर त्यांचा सुपडासाफ झाल्याचे दरेकर यांनी नमूद केले.

दिल्लीतील भाजपाच्या विजयाने अरविंद केजरीवाल यांची नौटंकी संपुष्टात आली आहे, तर काँग्रेस नेतृत्वाच्या दुर्बलतेमुळे त्यांचा दारुण पराभव झाला आहे, असे स्पष्ट चित्र दरेकर (Pravin Darekar) यांनी आपल्या भाषणातून मांडले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.