-
प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जयंती दिनी शिवरायांना श्रद्धांजली वाहत ट्विट केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आस्था आणि गंभीरता नाही, असा घणाघात भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला.
“राहुल गांधींनी मोठी चूक केली”
पत्रकारांशी बोलताना आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, शिवाजी महाराजांची जयंती ही औपचारिकता पाळण्याचा विषय नाही. ट्विट करताना राहुल गांधी कोणत्या नशेत होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे हा मोठा अपमान आहे. काँग्रेसने जर असा गाफीलपणा केला, तर महाराष्ट्रातील शिवभक्त आणि शिवप्रेमी काँग्रेसला मुळासकट उखडून टाकतील, असा इशाराही त्यांनी दिला.
(हेही वाचा – तुम्ही अतिरिक्त तिकिटे का विकता? Delhi station stampede नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने रेल्वेला फटकारले)
“मंत्रिमंडळ अजेंडा गोपनीय राहिलाच पाहिजे”
विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. मंत्रिमंडळाचा अजेंडा गोपनीय असतो आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली समज उचित आहे. महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गनिमी कावा अनेकदा अनुभवला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी विरोधासाठी विरोध न करता सरकारला सहकार्य करावे, असेही दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले.
“केवळ वक्तव्याने काँग्रेस उभारी घेणार नाही”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्यावर टीका करत दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, भाजपावर फोडाफोडीचा आरोप करण्याआधी काँग्रेसने आपल्या पक्षातील गटबाजी रोखावी. काँग्रेस पक्ष स्वतःच फुटलेला असून त्यांना पक्ष टिकवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. केवळ वक्तव्य करून काँग्रेसला उभारी मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
(हेही वाचा – Iranian Bakery : इराणी बेकरींना वारसा दर्जा?)
“संजय राऊतांनी शिळ्या कडीला ऊत आणू नये”
शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, राऊत आता शरद पवारांबाबतही बोलू लागले आहेत. अनेक गोष्टी ते बाहेर काढतील, त्यामुळे त्यांना पवारांवरही विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा वेगळा पक्ष उभारला असून ते सध्या राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे राऊत यांनी ‘गद्दार-गद्दार’ म्हणत बसण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची चिंता करावी. अन्यथा त्यांचा पक्ष आणखी खिळखिळा होईल आणि नेते, कार्यकर्ते शिंदे गटात जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
“मुंडे-धस भेटीत बावनकुळे यांचा काहीही संबंध नाही”
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार धस आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, बावनकुळे यांचा असा स्वभाव नाही आणि आमच्या पक्षाची ती प्रवृत्तीही नाही. धस यांनी घेतलेल्या आंदोलनावर कुठलीही तडजोड होणार नाही, त्यांच्या प्रामाणिकपणावर कुणीही शंका घेऊ नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community